पॅन कार्ड २.० आहे तरी काय ? नवीन पॅन कार्ड 2.0 कसे बनवावे जाणून घ्या

पॅन कार्ड २.० आहे तरी काय ? नवीन पॅन कार्ड 2.0 कसे बनवावे जाणून घ्या !

नवीन पॅन कार्ड 2.0 कोणतीही सरकारी काम करायचं असेल की त्यासाठी आपल्याला पुरावा म्हणून अनेक गोष्टी लागतात त्यापैकी एक म्हणजे पॅन कार्ड आहे . करदात्याच्या सोयीसाठी आणि त्याशिवाय आर्थिक सुरक्षा मिळावी आणि त्यासोबत सगळे व्यवहार सुलभ करण्यासाठी मोदी सरकारने पॅन कार्ड विषयी एक मोठा निर्णय घेतलेला आहे.सरकारने पॅन कार्ड विषयी मोठा निर्णय घेतलेला आहे.आता पॅन कार्ड मध्ये एक QR कोड असणार आहे.यावरून अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत की,आता त्यांचे पॅन कार्ड हे काही कामाचे नाही त्यांना या नव्या पॅन कार्ड साठी पुन्हा अर्ज करावा लागणार का त्यानंतर कधी आणि केव्हा पॅन कार्ड मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत.

काय वेगळं असेल?

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्याप्रमाणे पॅन कार्डचे हे नवीन वर्षं असणार आहे तर त्याचं नाव पॅनकार्ड 2.0 असेल हे तसेच असेल पण ज्या लोकांचे  अगोदरपासुन पॅन कार्ड असेल त्यांच्या पॅन नंबर मध्ये कोणताही बदल होणार नाही.तुमच्या पॅन कार्डचा नंबर तोच राहणार आहे .या कार्डवर एक QR कोड असेल याला स्कॅन केल्यानंतर करदात्याची सगळी माहिती समोर येईल QR कोड असलेल्या या पॅन कार्ड मधून कर भरण कंपनीचे नोंदणी करणे बँकेत खाते सुरू करण्याची काम अगदी सोप्यात पद्धती होतील .

कसे मिळणार नवीन पॅन कार्ड ?

तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळणार ज्याच्याकडे पॅन कार्ड आधीपासून आहे त्यांना नव्या पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणताही फॉर्म भरण्याची गरज देखील नाही नवीन पॅन कार्ड तुमच्या घरी पोहोचण्यात येईल याचाच अर्थ तुमचं पॅन कार्ड हे ऑटो अपडेट होणार आहे .

पॅन कार्ड 2.0 या सुविधांमुळे काय फायदा होणार ? 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार QR कोड असल्यामुळे पॅन कार्ड धारकांची  फसवणूक होणार नाही.आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

नवीन पॅन कार्ड ची गरज का भासते ?

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यानुसार पॅन कार्ड ऑपरेट करणार सॉफ्टवेअर पंधरा ते वीस वर्षे जुना झाला आहे. या सॉफ्टवेअरमुळे अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे या पॅन कार्ड सिस्टीमची डिजिटल तयारी करण्यात आली आहे .जेणेकरून कोणतीही तक्रार ट्रांजेक्शन कर फायलिंग सारख्या गोष्टींची खूप लवकर प्रोसेस करू शकता त्याशिवाय नवीन पॅन कार्ड सिस्टीम मधून फसवणूक करता येणार नाही किंवा खोटं पॅन कार्ड बनवता येणार नाही. नवीन सिस्टीम ची गरज यामुळे झाली कारण भविष्यात पॅन कार्ड हे युनिव्हर्सल आयडी म्हणून वापरण्यात येणार आहे.

पॅन कार्ड २.० या प्रकल्पातून किती लोकांना फायदा मिळणार आहे ?

देशातील 78 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी मोदी सरकारने मंजूर दिली आहे .या प्रक्रियेसाठी 1400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत युजरचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे.1972 पासून वापरण्यात असलेले तुमचे पॅन कार्ड आता बदलण्याच्या वाटेवर आहे.मोदी सरकारने पॅन कार्ड 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे .यामुळे देशातील सुमारे ७८ कोटी लोकांना आता आपले स्थायी खाते क्रमांक पॅन कार्ड बदलावी लागणार आहे.

शुल्क आकारले जाणार आहे का  ?

पॅन कार्डच्या अपडेट वर्जन साठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही असं केंद्रीय मंत्र्याचं म्हणणं आहे त्यासाठी कुठलीही अर्ज करण्याची गरज भासणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही देशातील ज्या 78 कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठवण्यात येणार आहे.

पॅन कार्ड 2.0 यामुळे पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपडेट केले जाईल जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होईल.

Leave a Comment

WhatsApp us

CALL NOW
Exit mobile version