
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२३ रोजी विश्वकर्मा दिवसाचं मुहर्त साधून सुरु केलेली एक नवीन योजना आहे . देशातील कारागीरांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणी त्यांना आर्थिक मदत करून यांनी आपली कला वाढवावी आणी प्रगती करावी हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य हेतू आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत खासकरून देशातील छोटे कारागीर सुतार, कुंभार ,लोहार हे आर्थिक वर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी पीएम विश्वकर्मा ही योजना एक वरदान ठरणार आहे. जर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेणार असाल आणी यासाठी काय पात्रता आहे, आणी या योजनेचे फायदे काय आहेत, यासाठी अर्ज कसा करायचा, याची सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश
भारत देशातील विविध प्रकरच्या जाती जमती सरकारकडून राबवलेल्या योजनेपासून वंचित राहत आहेत, त्यांना कामासाठी योग्य असे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे या योजनेचा मूळ उद्देेश हाच की सर्व जातीच्या लोकांना योग्य प्रशिक्षण देणे आणी त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायला कमी व्याज दरात् कर्ज उपलब्ध करून देणे.
या योजनेचे मुख्य कारण असे की, या जातीतील लोकांकडे व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नसतात, परंतु हे जर पक्के कुशल कारागीर असतील तर त्यांना या योजेने अंतर्गत आर्थिक मदत केली जाते.यामुळे ते लोक आर्थिक सक्षम होऊन देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देऊ शकतात.
या योजनेचे मुख्य कारण असे की, या जातीतील लोकांकडे व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नसतात, परंतु हे जर पक्के कुशल कारागीर असतील तर त्यांना या योजेने अंतर्गत आर्थिक मदत केली जाते.यामुळे ते लोक आर्थिक सक्षम होऊन देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देऊ शकतात.
पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे
- अश्याच लोकांना लाभ,ज्यांचा संबध विश्वकर्मा समाजाशी असेल.
- या योजेने अंतर्गत, लोहार, चांभार, माळी, शिंपी अश्या एकूण 140 जातींना याचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेमध्ये एकूण 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसायांना कर्ज मिळणार आहे.
- शिल्पकार, कारागीर यांना प्रमाणपत्र आणी ओळखपत्र दिले जाईल ज्यामुळे यांना एक नवी ओळख मिळेल.
- या योजनेमध्ये, विश्वकर्मा समाजाला योग्य प्रशिक्षण देऊन आर्थिक स्वरूपात मदत दिली जाते, त्यामुळे ते स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतात.
- कमीत कमी व्याजदारामध्ये कर्ज मिळवून दिले जाते,त्यामुळे ते स्वतःचा व्यवसायात प्रगती करून आर्थिक सक्षम होतीला आणी देशाच्या अर्थव्यवस्थे मध्ये योगदान् करतील.
- 7 या योजेने अंतर्गत शिल्पकार, कुशल कारागीर, यांना बँकेशी जोडून त्यांना MSME शी जोडले जाते.
पीएम विश्वकर्मा योजना चा लाभ कोणाला मिळणार
- लोहार
- सोनार
- चांभार
- न्हावी
- धोबी
- टेलर
- शिल्पकार
- कारपेंटर
- शेती अवजार् निर्माते
- माळी
- झाडू, चटाई , बनवणारे.
- पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत 140 जातींना या योजनेचा लाभ मिळणार आहे
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईझ फोटो
- बँक अकाउंट पासबुक
- तुमचे वय 18 पेक्षा जास्त